Fake currency : बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त; तब्बल ‘इतक्या’ लाखांच्या बनावट नोटा जप्त

Fake currency – गुन्हे शाखा घटक २ च्या पोलीस पथकाने बनावट नोटा तयार करणार्या रॅकेटचा पर्दाफाश करून सहा जणांना ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांच्या भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
तसेच बनावट नोटा तयार करण्याचे साहित्यही जप्त केले आहे. सुरज तानाजी शेंडे, भरत वाळकु सासे, स्वप्नील जगदीश पाटील, रामदास शालिक दळवी, विजय सुदाम कर्णेकर उर्फ विकी, शेखर रामदास बत्तीन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही इसम बनावट नोटा तयार करून त्या खुल्या बाजारात खर्या नोटांशी अदलाबदल करून चलनात आणण्यासाठी भिवंडीतील अवचित पाडा येथील मकदुमीया कॅफे जवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळाली.
त्यानुषंगाने सापळा रचून सूरज, भरत आणि स्वप्नील या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५०० च्या बनावट नोटांचे एकूण ६० बंडल त्यामध्ये प्रत्येकी १०० नोटा असे एकूण ३० लाख रुपये जप्त करण्यात आले.





