आघाडीत बिघाडी! सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदेंचा ठाकरे गटाला धक्का; ऐनवेळी दिला अपक्षाला पाठिंबा

Maharashtra Assembly Election 2024 | दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभामतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. मात्र खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यासाठी प्रचारात आघाडी घेतली होती.
याबाबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी माध्यमांना जाहीरपणे माहिती देताना सांगितले की, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवसेनेने गडबड केली आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ स्वतःकडे ठेवला. दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी स्पष्टपणे सांगितले आहे.
तर खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, या मतदारसंघाने मुख्यमंत्री निवडून दिला आहे. आघाडी धर्म आम्ही पाळला असून आम्ही एबी फाॅर्म दिलेला नाही. या जागेवरून काही गैरसमज झाले होते, चुकून केलं असेल असं वाटलं, पण आम्ही काडादींच्या मागे आहोत. जो जिता वही सिकंदर…” असेही त्या म्हणाल्या आहेत.
अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने उबाठा गटाला धक्का
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदें यांनी महाविकास आघाडीचा धर्म विसरून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी नेहरू नगर येथील मतदान केंद्रावर सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदें बरोबर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी उपस्थित होते. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना उबाठा गटाला धक्का बसला आहे.
हेही वाचा:
“मतदानाचा टक्का यावेळेला वाढेल अन्…” मतदानानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया





