फहाद फासिल बॉलीवुडमध्ये करणार पदार्पण; सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार

Fahad Faasil Bollywood Debut | अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाच्या कथेसोबतच त्यातील गाणी, संवाद आणि प्रत्येक पात्राचे खूप कौतुक झाले. लवकरच या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मात्र आता ‘पुष्पा’ चित्रपटातील खलनायक बॉलीवूडमध्ये एंट्री करणार असल्याचा दावा केला जात आहे.
यात एसपीच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता फहाद फासिलची सर्वाधिक चर्चा झाली. आता साऊथचा हा प्रसिद्ध स्टार हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या चित्रपटातून फहादची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होऊ शकते. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, फहाद आणि इम्तियाज गेल्या काही महिन्यांत अनेकदा भेटले आहेत आणि असे मानले जात आहे की दोघेही काही प्रोजेक्टवर एकत्र काम करणार आहेत.
View this post on Instagram
इम्तियाजच्या सर्व चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील प्रेमकथेवर आधारित असण्याची शक्यता आहे. इम्तियाज अलीसारख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी फहाद खूप उत्सुक आहे. इम्तियाजने ‘हायवे’, ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ आणि ‘अमर सिंह चमकीला’ सारखे उत्तम चित्रपट केले आहेत. तर आता इम्तियाज अलीचा नवा चित्रपट २०२५ च्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
“शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्या”; राज ठाकरेंचे राज्य सरकारला आवाहन





