Devindra Fadanvis : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून “मी पुन्हा येईन…” ची रीघ ओढत फडणवीसांची तुफान फटकेबाजी; उपस्थितांमध्ये पिकला हशा

पुणेः शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थित पार पडले. या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
साहित्य संमलनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका चिमुऱ्याड्याने मी पुन्हा येईल, असे म्हणाल्याची आठवण सांगितली. यावेळी ते म्हणाले मी पुन्हा येईल माझा पिच्छा सोडत नाही. अलीकडच्या काळात चांगले म्हणतात. मागच्या काळात उपहासाने म्हणत होते. शेवटी एखादा शब्द आपल्याला चिपकतो. पण काळ आणि वेळ याप्रमाणे त्याचे अर्थ बदलत असतात, असे फडणवीस यावेळी म्हणाले. पण तुम्ही सगळ्यांनी हे ठरवलं पाहिजे की, जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशी तुफान फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केली. या त्यांच्या वाक्यवर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जानंतर पहिले संमेलन असल्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांचे आभार मानले. मराठीचा विचार करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचाराशिवाय ते पूर्ण नाही. दिल्लीत साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही केले ही देखील आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतःला भाग्यवान समजत असल्याचे फडणवीस म्हणाले.
एआयचा वापर करावा
आज सगळीकडे एआयचा बोलबाला पाहायला मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसारासाठी वापर केला पाहिजे. एआय युगात जर आपण स्मॅाल लँग्वेज मॅाडेलमध्ये सर्व साहित्यकांचे साहित्य टाकले. तर येणाऱ्या पिढीला साहित्यकांनी काय लिहिले आहे, हे समजेल. त्यासाठी मराठी भाषा विभागाने एआयचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.
तीन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवाणी
तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी वाहिलेल्या संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, बालसाहित्यावर चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, मराठी भाषेशी संबंधित सादरीकरण यांच्यासोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.





