Sushma Andhare : “फडणवीस देशमुख कुटुंबाच्या भावनांशी खेळले”; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Updated On:

Sushma Andhare – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो व व्हिडिओ अडीच महिन्यांपूर्वीच मिळाले होते. पण त्यानंतरही त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ मांडला.
आता नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
सुषमा अंधारे मंगळवारी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या की, आरोपीबद्दल खडानखडा माहिती असताना सुद्धा फडणवीसांनी जाणीवपूर्वक पक्षीय अजेंडा राबविण्यासाठी मौन बाळगले.
सगळी माहिती फोटो व्हिडिओ हाताशी असून सुद्धा अडीच तीन महिने देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आधी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा.





