भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात,”आम्ही एकत्र येऊन काम करू…”

Fadnavis on Raj Thackeray। आगामी निवडणुकांमध्ये नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाजपसोबत युती होण्याच्या चर्चा रंगत असतात. सध्या राज्यात असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चेला जोर मिळतोय. याच मुद्द्यावर आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण विधान केलंय.
मनसे कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल Fadnavis on Raj Thackeray।
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी,”आगामी काळात मनसे कुठे असेल, कोणाबरोबर असेल ते वेळच सांगेल. आमची निश्चितपणे राज ठाकरे यांच्याशी मैत्री आहे. आमच्या भेटीगाठी होत असतात. आम्ही अनेक विषयांवर गप्पा मारतो. ते बऱ्याचदा काही चांगल्या सूचना करतात. कधीकधी आमच्यावर टीकाही करतात. परंतु, आम्ही एकत्र येऊन काम करू की नाही हे आत्ता सांगू शकत नाही. ही गोष्ट लवकरच आपल्याला संमजेल. अद्याप कोणीही त्यावर निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी म्हटले.
हेहीवाचा
भाजप मनसे युती होणार? मनसेच्या नेत्यांची फडणवीसांसोबत गुप्त भेट; या भेटीचं नेमकं कारण काय
कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात Fadnavis on Raj Thackeray।
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनादेखील माध्यमांनी असाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी इथे भाजपाबरोबर जाण्याचा प्रश्न नाही, कोणीही कोणालाही भेटलं की युत्या होत नसतात. मागे एकदा बाळासाहेबांचं (शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे) पुस्तक प्रकाशित केलं तेव्हा मंचावर शरद पवार उपस्थित होते, म्हणजे लगेच आमची युती झाली का? तो तुम्हा प्रसारमाध्यमांच्या रोजच्या बुलेटिनचा भाग असेल, त्याचा आमच्याशी संबंध नसतो.
राज्यात सध्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वरचेवर राज ठाकरे यांना भेटत असतात. त्यामुळेच मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.





