फडणवीस हे सर्वात अपयशी गृहमंत्री- चाकणकर

उस्मानाबाद : राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हि यात्रा आली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी “फडणवीस हे सर्वात अपयशी गृहमंत्री असून त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता” अशी टीका आपल्या भाषणातून केली आहे.

त्या म्हणाल्या, मागील पाच वर्षात महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. त्याचा जनतेत रोष असून त्याची भीती वाटते म्हणून मुख्यमंत्री पोलिसांच बंदोबस्त घेऊन यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रेच स्वागत हे काळे झेंडे दाखवून होत आहे. या सरकारचा पापाचा घडा एवढा भरला आहे की त्यांना जनतेसमोर जायला भीती वाटत आहे. ७० वर्षात काय केलं असं विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जर आघाडी सरकारच्या काळात पोलिओ डोस मिळला नसता तर ते वेडे वाकडे जन्माला आले असते. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×