केवायसी फेर पडताळणीला मुदतवाढ
Updated On:

मुंबई – रिझर्व बॅंकेकडून नियंत्रित बॅंका आणि इतर वित्तीय संस्थांना ग्राहकाच्या केवायसीची फेर पडताळणी 31 डिसेंबर पर्यंत करण्याच्या सूचना या अगोदर रिझर्व बॅंकेने जारी केल्या होत्या. मात्र एकूण परिस्थिती पाहता हे काम पूर्ण होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता असल्यामुळे आता या कामासाठी रिझर्व बॅंकेने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या अगोदरही हे काम पूर्ण न झाल्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्या अगोदर करोना व्हायरसमुळे मुदतवाढ देण्यात आली होती. आता ओमायक्रॉनमुळे परिस्थिती बिघडली असल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने सूचित केले आहे.
टॅग्स:




