Pune : चार विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

पुणे : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवास मिळावा आणि स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेकडून पुणे विभागातून दौंड-सोलापूर आणि पुणे-हरंगुळ, पुणे-कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे-हरंगुळ-पुणे दैनंदिन धावणारी विशेष गाडी आता दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे. सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी दि. २५ मार्च २०२५ तर लोकमान्य टिळक टर्मिनस-सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी दि. २६ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे.
पुणे-कोल्हापूर-पुणे दरम्यान दैनंदिन धावणारी विशेष गाडी दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत धावणार आहे तर दौंड-सोलापूर-दौंड डेमू अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी दि.३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आले आहे.
सोलापूर – दौंड दैनंदिन डेमूचा कालावधीही दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. वरील सर्व गाड्यांचे दिवस, वेळ, रचना आणि थांबे यामध्ये कोणताही बदल होणार नाही. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.





