हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ
Updated On:

मुंबई – राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 14 डिसेंबरपर्यंत 551 खरेदी केंद्रांवर केवळ 1 लाख 31 हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकर्यांना नोंदणीसाठी 15 डिसेंबरवरून 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य सरकारनं 4,892 रुपये प्रतिक्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लि. या दोन संस्थांना दिले आहेत.
ही खरेदी 67 हजार 753 शेतकर्यांकडून करण्यात आली आहे. राज्यात यासाठी 581 केंद्रांना खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. त्यातील 551 केंद्रं सुरू असल्याची माहिती सहकार आणि पणन विभागानं दिली.





