राहुल गांधींचं शेतकऱ्यांना मोठं आश्वासन; सोयाबीनला किती हमीभाव देणार ते सांगितलं…

अमरावती – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा ( Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. चार दिवसांनी 20 नोव्हेंबरला सर्व 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी आता प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून मोठमोठी आश्वासने दिली जात आहेत. काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज अमरावतीत राज्यातील शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले आहे. त्यांनी सोयाबीनला किती हमीभाव दिला जाईल याबाबत आश्वासन दिलंय.
राहुल गांधी अमरावती येथे एका प्रचारसभेत म्हणाले, या अदानी समर्थित सरकारकडून काहीच होणार नाही. आमच्या सरकारद्वारे सोयाबीनसाठी 7 हजार रुपये प्रति क्विंटल किंमत मिळेल. महाविकास आघाडीच्या सरकारद्वारे 3 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी केली जाईल. सोयाबीन उत्पादक शेतकरी किमान आधारभूत किंमतीबाबत चिंतेत असल्याचे दिसून आले आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारात त्यांना योग्य किंमत मिळत होती, परंतु या अदानी समर्थित सरकारने MSP दिली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र: “अदानींच्या पाठिंब्याने बनलेलं सरकार हे करणार नाही, पण मी खात्री देतो की आमचं सरकार सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ७००० रूपये देईल ” अमरावतीत राहुल गांधी यांची गॅरंटी
आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन देतो की त्यांनी काळजी करू नये; आमचे (मविआ) सरकार ३ लाख कोटी… pic.twitter.com/pnG2FmixjI
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 16, 2024
महाविकास आघाडी सरकार कांद्याच्या किंमती नियंत्रणासाठी एक उचित किंमत समिती स्थापन करेल. कापूस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. मोदींनी अदानींना मोफत पैसे देण्यास जितके सहजतेने देतात, तितके कापूस उत्पादन करणे सोपे नाही. त्यामुळे आम्ही कापूस शेतकऱ्यांना MSP सुनिश्चित करण्याचे वचन देत आहोत, असेही आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
महाविकास आघाड़ी महाराष्ट्र के किसानों के लिए ऐतिहासिक क़दम उठाने जा रही है।
– सोयाबीन के लिए ₹7,000/क्विंटल MSP + बोनस
– प्याज़ के लिए उचित क़ीमत तय करने वाली कमेटी
– कपास के लिए भी सही MSPपिछले तीन चुनावों से भाजपा सोयाबीन के लिए 6000 रुपए की MSP का वादा कर रही है लेकिन आज…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 15, 2024





