पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट ; 21 जण ठार, डझनभर जखमी

Explosion in Pakistan Railway Station । पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी मोठा स्फोट झाला. या स्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. अलीकडे पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय येथे फुटीरतावादी बंडखोरीही वाढत आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली Explosion in Pakistan Railway Station ।
वरिष्ठ पोलीस अधीक्षक (ऑपरेशन्स) मुहम्मद बलोच म्हणाले, “पेशावरहून जाणारी एक्स्प्रेस आपल्या गंतव्यस्थानाकडे निघणार असताना रेल्वे स्थानकात हा स्फोट झाला.” स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव कर्मचारी स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले.
याशिवाय क्वेट्टाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर जखमींवर उपचार करण्यासाठी अतिरिक्त डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफला पाचारण करण्यात आले आहे. माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटातील मृतांचा आकडा वाढू शकतो कारण अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.
राष्ट्रपतींनी या घटनेचा निषेध केला Explosion in Pakistan Railway Station ।
पाकिस्तानचे अध्यक्ष सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी निरपराध लोकांना लक्ष्य केले आहे. यावेळी त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. त्याच वेळी, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.





