रमजान ईदआधी मशिदीत स्फोट; बीडमधील घटना समोर

Beed Crime | बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात मशिदीमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. रमजान ईदच्या काही तासापूर्वी बीडमधील अर्धामसला गावातील मशिदीत पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेत दोन आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास गावातील मशिदीमध्ये दोन युवकांनी जिलेटीनच्या माध्यमातून स्फोट घडवून आणला. यात मशीदीमधील फरशी आणि बांधकामाला तडे गेले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात स्वतः पोलीस अधीक्षकांनी पहाटेच गाव गाठून तपास सुरू केला. गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. Beed Crime |
तलवाडा पोलिस ठाण्यात दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथकाकडून या ठिकाणी तपासणी करण्यात आली. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. तर पोलिसांनी शांततेच आवाहन केले आहे. Beed Crime |
हेही वाचा:
प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीनासाठी करणार अर्ज?





