Ayushmann Khurrana | अभिनेता आयुष्मान खुरानाने बजावला मतदानाचा अधिकार

Ayushmann Khurrana | देशातील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडले जात आहे. सातव्या टप्प्यासाठी 57 जागांसाठी 904 उमेदवार रिंगणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक नेत्यांसह बॉलीवूड कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यातच आता अभिनेता आयुष्मान खुराना चंदीगडमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
यानंतर आयुष्मान माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला, “”मी मतदान करण्यासाठी आणि माझा हक्क बजावण्यासाठी माझ्या शहरात परत आलो. मुंबईत यावेळी खूपच कमी मतदान झाले पण आपण मतदान केले पाहिजे. जर आपण मतदान केले नाही तर आपल्याला तक्रार करण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत त्याने मतदारांना मतदानाचे आवाहन केले. Ayushmann Khurrana |
दरम्यान, या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाची सकाळी 11 वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आलीय. यामध्ये हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त मतदान झाले आहे. तर तिकडे बिहार आणि ओडिसामध्ये संथ गतीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7 व्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 26.30% मतदान झाले आहे. Ayushmann Khurrana |
हेही वाचा:
विजय वडेट्टीवार एक्झिट पोलबाबत स्पष्टच बोलले; म्हणाले “मतपेट्यांची सुरक्षितता…”





