एक्‍झिट पोलचे निकाल हे अंतिम निकाल नव्हेत – गडकरी

नागपुर: एक्‍झिट पोलचे निकाल हे अंतिम निकाल नव्हेत. यात फरक पडू शकतो पण भाजपला केंद्रात निश्‍चीत सत्ता मिळेल असे भाकीत ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. एनडीए सरकारच्या विकासामुळेच आम्हाला मोठे यश मिळेल असा दावाहीं त्यांनी केला आहे.

नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शना निमीत्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते. ते म्हणाले की एक्‍झिट पोलचे निकाल हे कधीच अंतिम निकाल नसतात. त्यातून केवळ संकेत मिळतात असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. तथापी भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळेल आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात नमूद केले. आपण पंतप्रधानपदासाठी उत्सुक नाही असे आपण किमान 20 ते 50 वेळा स्पष्ट केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपला महाराष्ट्रात गेल्या वेळे इतक्‍याच जागा मिळतील असा दावाहीं त्यांनी यावेळी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)