“कुली नं 1′ मधील “तेरे सिवा’ गाणे वगळले

मुंबई – कॉमेडी रोमांटिक “कुली नं 1′ मधील “तेरे सिवा’ हे गाणे वगळण्याचा निर्णय घेतला गेला आहे. “कुली नंबर 1′ चा प्रीमियर 25 डिसेंबरला ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर झाला. त्यामध्ये “तेरे सिवा’ हे गाणे होते.
View this post on Instagram
समुद्रकिनाऱ्यावर चित्रित झालेले हे हळूवार प्रेमगीत वरूण धवन आणि सारा अली खानवर चित्रीत केले गेले होते. रेनेसा दास आणि ऍश किंग यांनी हे गाणे गायले होते. तर गीताचे बोल रेशमी विरागने लिहीले होते.
View this post on Instagram
या गाण्याला तनिष्क बागचीने संगीत दिले होते. 1995 साली हिट झालेल्या मूळ सिनेमामध्ये गोविंदा, करिश्मा कपूर, हरिश, कादर खान यांनी लीड रोल केले होते. डेविड धवनचा हा 45 वा सिनेमा होता. आता त्याच्या रीमेकमध्ये डेव्हिड धवन यांचा पुत्र वरूण धवन लीड रोलमध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram
“तेरे सिवा’ हे गाणे वगळण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कदाचित ऑनलाईन सिनेमा पाहणाऱ्या प्रेक्षकांना ते अपील होणार नाही, असे निर्मात्यांना वाटले असावे. मात्र प्रेक्षकांमध्ये या गाण्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत, याचा अंदाज घेतल्यानंतरच ते वगळण्याचा निर्णय झाला असावा.
View this post on Instagram





