खळबळजनक बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्वीटर अकाऊंट हॅक; खात्यावर पाकिस्तानचे व्हिडीओ

Updated On:
खळबळजनक बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्वीटर अकाऊंट हॅक; खात्यावर पाकिस्तानचे व्हिडीओ

Eknath Shinde social media account : महाराष्ट्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सोशल मीडिया अकाऊंट एक्स (ट्वीटर) हे खाते हॅक झाले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, या खात्यावर पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडीओ दिसत होते. मात्र, या घटनेची गंभीर दखल घेत शिंदें यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या टीमकडून खाते रिकव्हर करण्यात आले आहे.

मात्र, यामुळे पुन्हा एकदा सायबर हल्ल्यामुळे सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अधिकृत एक्स (Twitter) खाते हॅक झाल्यानंतर या खात्यावर पाकिस्तान आणि तुर्की येथील व्हिडिओ पोस्ट झाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांचं ट्वीटर हे खातं रेकव्हर करण्यात येत आहे. असं असलं तरी ही घटना उच्चस्तरीय सायबर हल्ला आणि राजकीय हस्तक्षेप मानली जात आहे.

या घटनेचा आता सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. खाते कुणी हॅक केले याचा शोध पोलिस घेत आहे, खाते हॅक करण्याचा मागचा हेतू काय होता ? याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

आणखी संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

2026-08-23 18:31:57

Chhagan Bhujbal : "मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही" - छगन भुजबळ

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

2026-08-23 16:05:46

NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला? शरद पवारांच्या 'त्या' बैठकीकडे सर्वांची नजर!

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

2026-08-23 12:04:02

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची दादा भुसेंसोबत चार तास बैठक! अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

2026-08-22 22:59:41

Pune : ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने पुणे विद्यापीठ परिसर दुमदुमला; युवाशक्तीचा देशभक्तीचा हुंकार

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी

2026-08-22 19:26:59

LPG Pipeline Project : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये 1800 किमी LPG पाईपलाईन, 7000 कोटींची मंजुरी