बुलढाण्यात खळबळ…! समाज माध्यमातून धमकी देत भाजप आमदार संजय कुटेंचे निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न

Sanjay Kute : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चक्क भाजप आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान पेटवून देण्याची धमकी देत निवासस्थानी जाऊन निवासस्थानात प्रवेश मिळवून निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेली नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. संजय कुटे यांच्या स्वीय सहायकाने या शेतकऱ्याला वेळीच पकडल्याने पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुरुख सोनाळा याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मात्र,
या प्रकरणी संजय कुटे यांचे स्वीयसहाय्यकने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीसांनी शेतकरी विशाल मुरुख याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाच्या सुरक्षेचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावातील शेतकरी विशाल सुधाकर मुरुख यांना २०२४ साली अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले होते. त्यांनी वेळावेळी संग्रामपूर तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा केली होती. मात्र, तरीही त्यांना नुकसान भरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्याने समाज माध्यमात जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे निवास्थान ‘तृप्ती व्हिला’ जाळून टाकण्याची धमकी दिली.
हेही वाचा : Pune : ‘एमएचटी-सीईटी’ निकालाच्या तारखा जाहीर





