Pune : ‘एमएचटी-सीईटी’ निकालाच्या तारखा जाहीर
Updated On:

पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटीच्या निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत झालेल्या एमएचटी-सीईटीमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच पीसीएम या गटातील सीईटीचा निकाल १६ जून रोजी, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र अर्थात पीसीबी गटाचा निकाल १७ जून रोजी जाहीर होणार आहे.
हा निकाल www.mahacet.org आणि www.mahacet.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लाॅगीनमध्ये प्रसिद्ध होईल, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली.





