Ex-Prince Andrew arrested: ब्रिटनचे राजपुत्र अँड्र्यू यांना अटक; एपस्टीन प्रकरणात वाढल्या अडचणी, जन्मठेपेची टांगती तलवार
Ex-Prince Andrew arrested: वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता सँडरिंगहॅम येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या दिवशी अँड्र्यू यांचा वाढदिवस आहे, त्याच दिवशी ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

Ex-Prince Andrew arrested: ब्रिटीश राजघराण्याला हादरवून टाकणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स अँड्र्यू यांना सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, गुरुवारी सकाळी ८ वाजता सँडरिंगहॅम येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या दिवशी अँड्र्यू यांचा वाढदिवस आहे, त्याच दिवशी ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.
काय आहे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण कुख्यात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित आहे. पीडित व्हर्जिनिया गिफ्रे यांनी असा आरोप केला होता की, २००१ मध्ये जेव्हा त्या अवघ्या १७ वर्षांच्या होत्या, तेव्हा प्रिन्स अँड्र्यू यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्यांचे लैंगिक शोषण केले. हे शोषण तेव्हा झाले जेव्हा अँड्र्यू ब्रिटनचे व्यापार दूत म्हणून कार्यरत होते. जरी अँड्र्यू यांनी हे सर्व आरोप फेटाळले असले, तरी अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांचे एपस्टीनशी असलेले जवळचे संबंध उघड झाले आहेत. या गुन्ह्यासाठी इंग्लंडमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे.
किंग चार्ल्स यांची कठोर कारवाई –
या गंभीर आरोपांनंतर किंग चार्ल्स यांनी आपल्या भावाविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनानुसार, अँड्र्यू यांच्याकडून ‘प्रिन्स’ हा किताब, सर्व लष्करी पदव्या आणि शाही सन्मान काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता त्यांना ‘प्रिन्स अँड्र्यू’ ऐवजी केवळ ‘अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर’ या नावाने ओळखले जाईल. ब्रिटीश इतिहासात १०६ वर्षांनंतर एखाद्या राजपुत्राची पदवी काढून घेण्याची ही पहिलीच घटना आहे.

फोटोमध्ये प्रिन्स अँड्र्यू आहेत, ज्यांचा हात 17 वर्षीय व्हर्जिनिया गिफ्रे यांच्या कमरेवर आहे. हा फोटो 10 मार्च 2001 रोजी लंडनमध्ये मॅक्सवेलच्या घरी काढण्यात आला होता.
रॉयल लॉज सोडावे लागणार –
अँड्र्यू यांना केवळ पदव्याच नव्हे, तर त्यांचे आलिशान निवासस्थान ‘रॉयल लॉज’ देखील रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २००३ पासून ते या ३० खोल्यांच्या महालात राहत होते. आता त्यांना हे घर सोडून साध्या खासगी घरात राहावे लागेल. त्यांच्यासोबत राहणारी त्यांची पत्नी सारा फर्ग्युसन हिला देखील हे घर सोडावे लागणार आहे.
पीडितेचा मृत्यू आणि आत्मचरित्र –
या प्रकरणातील मुख्य तक्रारदार व्हर्जिनिया गिफ्रे यांचे एप्रिल २०२५ मध्ये निधन झाले असून, प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले गेले. मात्र, त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी ‘नो बॉडीज गर्ल’ हे आत्मचरित्र पूर्ण केले होते, जे २१ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी अँड्र्यू यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले असून, लैंगिक संबंध प्रस्थापित करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याचे अँड्र्यू यांना वाटायचे, असा दावा गिफ्रे यांनी केला आहे.
राजघराण्यातील उत्तराधिकाराच्या शर्यतीत अँड्र्यू अजूनही आठव्या क्रमांकावर असले, तरी या कायदेशीर कारवाईमुळे त्यांचे सार्वजनिक जीवन आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: शिवजयंतीचा जल्लोष ते शेअर बाजारातील घसरण, राजकारण-क्रीडा-तंत्रज्ञानात मोठ्या घडामोडी


