Baba Siddique: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना विषबाधा; प्रकृतीविषयी डॉक्टरांची महत्त्वाची अपडेट

Baba Siddique – माजी मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची प्रकृती खालावली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकांच्या आधी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. ते जवळपास 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गत 20 ऑगस्ट रोजी ते राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती ढासळली. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
त्यानंतर 2014 पर्यंत सलग 3 वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषवले आहे.





