“प्रत्येक परिस्थितीत सगळ्यांना एकत्र…”; रितेशने सासूबाईंसाठी शेअर केली आदरपूर्वक पोस्ट

Riteish Deshmukh | अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची जोडी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. जिनिलिया देशमुखची आई जीनेट डिसूजा यांच्यासाठी तिने खास पोस्ट शेअर केली होती. या खास प्रसंगी जिनिलियाने सोशल मीडियावर तिच्या आईला मिठी मारताना एक अतिशय गोड फोटो शेअर केरत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
त्यानंतर रितेश देशमुखने देखील सोशल मिडियावर सासूबाईंसाठी एक खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तो सासूबाईंना ‘मम’ या प्रेमळ नावाने हाक मारतो. Riteish Deshmukh |
View this post on Instagram
रितेशनं पोस्टमध्ये सासूबाईंबद्दल आदर व्यक्त करत लिहिले की, “प्रिय मम… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही खरोखरच आमच्या कुटुंबाचं हृदय आहात. ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं. तुम्ही संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी खूप मेहनत घेतलीत, दोन अप्रतिम मुलांना वाढवलंत, ज्यांनी तुम्हाला नेहमी अभिमान वाटेल असं काम केलं. आणि आता तुमचे नातवंडे तुम्हाला पाहताक्षणी आनंदाने उजळून निघतात.”
पोस्टमध्ये रितेशनं आपल्या सासूबाईंसह सासऱ्यांचाही उल्लेख करत म्हटलं की, “पॉप्स अजूनही तुमच्याकडे तसंच पाहतात, जणू तुम्ही त्यांचं संपूर्ण विश्व आहात. तुमचं शांत सामर्थ्य, असीम प्रेम आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याची ताकद मला दररोज प्रेरणा देते. आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही आम्हाला जितकं प्रेम देता, त्याच्या किमान अर्धं जरी तुम्हाला आज जाणवलं तरी खूप आहे. कारण आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!” Riteish Deshmukh |
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचं लग्न ३ फेब्रुवारी २०१२ रोजी मराठी पद्धतीने पार पडलं. रितेश आणि जिनेलियाची पहिली भेट २००२ मध्ये त्यांच्या डेब्यू चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ च्या सेटवर झाली होती आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. त्यांना दोन मुले आहेत.
हेही वाचा:
लोकसभेत ‘वंदे मातरम’वर १० तास विशेष चर्चा ; पंतप्रधान म्हणाले,”वंदे मातरममुळे नवी ऊर्जा… “





