Riteish Deshmukh : रितेश देशमुखकडून रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाचे कौतुक
Riteish Deshmukh : रितेश देशमुखने ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली.

Riteish Deshmukh : अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘धुरंधर २’ चित्रपटाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यानेही या चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रितेश देशमुखने ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. ‘धुरंधर २’चे कौतुक करत त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “हा एक अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव होता.
रणवीर सिंह, स्क्रीनवर तू जादू केली. प्रत्येक फ्रेममध्ये तुझी उपस्थिती जाणवली आणि तू भावना खूप प्रभावीपणे व्यक्त केल्या.” Riteish Deshmukh
पुढे त्याने राकेश बेदी यांच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं, “सर, तुम्ही नेहमीप्रमाणे उत्कृष्ट काम केलं आहे. तर अर्जुन रामपाल, तुझं काम खूप प्रभावी आहे. संजय दत्त सर, स्क्रीनवरील तुमचा दबदबा जबरदस्त होता. सारा अर्जुन, तू खूप प्रतिभावान आहेस. तुझ्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.”
दिग्दर्शक आदित्य धरबद्दल त्याने, तुझं काम विलक्षण आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खास असल्याचे म्हंटले आहे. यामी गौतमचेही त्याने अभिनंदन केले. Riteish Deshmukh
आर. माधवनबद्दल रितेश म्हणाला, “तू अप्रतिम आहेस. प्रत्येक संवाद तू उत्कृष्टरीत्या सादर केला. ‘धुरंधर २’ला मिळत असलेल्या यशासाठी तुला मनापासून अभिनंदन.” दरम्यान, या चित्रपटाचे सेलिब्रिटींसह चाहत्यांकडूनही कौतुक केले जात आहे.
हेही वाचा:







