नगर – स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्नावर सर्वांनी दक्ष रहावे : न्या. संगीता भालेराव

नगर – सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्नावर सर्वांनी दक्ष रहावे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:चे घर व परिसरापासून केल्यास संपूर्ण शहर स्वच्छ होणार आहे. पर्यावरणाच्या प्रश्नावर जागृक राहून समाजात जागृकता निर्माण करावी. पर्यावरण व स्वच्छतेसाठी शासन जबाबदारी पार पाडत असून, नागरिकांनी देखील कर्तव्य म्हणून योगदान देण्याचे आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांनी केले.
स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालय वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्वच्छता अभियानानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून सार्वजनिक स्वच्छेतेची जागृती करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी न्यायाधीश समीना खान, कामगार न्यायालयाचे (द्वितीय) न्यायधीश ए.जी. देशमुख, सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी. एस. लखोटे, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे, माजी अध्यक्ष शिवाजी कराळे पाटील, सीएसआरडी महाविद्यालयाच्या वैशाली पठारे, सॅम्युअल वाघमारे, माजी उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. ज्ञानेश्वर दाते, ॲड. पी. डी. म्हस्के, ॲड. शिवाजी डमाळे, ॲड. करुना शिंदे, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. वैशाली दाळवाले, प्रबंधक एस.के. मोहोळकर, विवाह समुपदेशक अलका राठोड, अर्चना झिंजे, शेखर मेहेत्रे, धीरज नारखेडे, सतीश राऊत, सौ. चव्हाण, एल.एस. जाधव, एस.के. जाधव, एस.बी. अळकुटे आदींसह सीएसआरडी महाविद्यालयाचे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्या. भालेराव यांनी समाज जागृतीसाठी पथनाट्य प्रभावी माध्यम असल्याचे सांगून, सीएसआरडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मण कचरे यांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करुन पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. सीएसआरडी महाविद्यालयातील ग्रामविकास अध्ययन व संशोधन केंद्रातील युवक-युवतींनी सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणावर जागृतीवर पथनाट्याचे सादरीकरण केले. स्वच्छतेची सुरुवात माझ्यापासून या पथनाट्याचे सादरीकरण करुन सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. तर पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नावर जागृती करुन झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश दिला. केली. तसेच यावेळी ॲड. शिवाजी कराळे व अर्चना झिंजे यांनी विनोदी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पथनाट्यातील कलाकारांना दाद दिली.




