Sharad Pawar : मी ज्योतिषी नाही.! ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार स्पष्टच म्हणाले…

Sharad Pawar – सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगले आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला होता. कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्य सरकारच्या वतीने करण्यात येत असलेल्या हिंदी सक्तीला देखील त्यांनी विरोध दर्शवला.
शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलेच आहे. मात्र येतील का नाही? हे सांगायला मी ज्योतिषी नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. संजय राऊत एकत्र येण्याचे सांगत आहे. त्यामुळे आणखीन चांगले, असे खोचक उत्तर शरद पवारांनी दिले आहे.
कोणी एकत्र येऊन, सर्व विसरून काही करत असतील, तर ती गोष्ट केव्हाही चांगली. दोन भावांमध्ये मतभेद असतील आणि मतभेद विसरून एकत्र काम करण्याचे त्यांनी ठरवले तर नाराज होण्याचे काही कारण नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. काका-पुतण्याच्या प्रश्नावर मात्र, त्यांनी हसून उत्तर देणे टाळले आहे.





