विद्या बालनचा नवा लूक पाहून सारेच थक्क…

Vidya Balan | बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा नवा लूक चाहत्यांसमोर आला आहे. नुकत्याच एका मॅगझिनच्या कव्हरसाठी तिने फोटोशूट केले. हे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले.
मंगळवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या विद्या बालनची आणखी एक कव्हर स्टोरी आली आहे. ‘अ फोर्स टू रेकन विथ विद्या बालन’ नावाची कव्हर स्टोरी पुरुषप्रधान इंडस्ट्रीत सिनेमाचा व्यवसाय पुढे नेण्यावर आधारित आहे. कव्हरवर, विद्याने डीप नेक असलेला लाल रंगाचा गाऊन, तपकिरी केस आणि दागिने घातले आहेत. तिच्या लूकने अनेक जण थक्क झाले आहे.
View this post on Instagram
हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी अभिनेत्री तिच्या वयापेक्षा खूपच तरुण दिसत असल्याचे म्हंटले आहे. तर काहींनी बॉलीवुडमधील सध्याच्या कलाकारांनी तिच्याकडून प्रेरणा घ्यावी, असा सल्ला देखील दिला आहे. याशिवाय अनेकांनी बोटोक्स आणि सर्जरीच्या जगात तिला नॅचरल ब्युटी म्हटलं आहे. Vidya Balan |
दरम्यान, विद्या बालनने आपल्या कारकीर्दिला टेलिव्हिजनपासूनच सुरुवात केली. अशोक सराफ स्टार ‘हम पांच’ या गाजलेल्या मालिकेतून विद्या बालननं मनोरंजन विश्वास पदार्पण केलं. त्यानंतर विद्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. Vidya Balan |
हेही वाचा:
व्यापार कराराच्या नावाखाली अमेरिका भारतात गायीचे मांसाहारी दूध पाठवण्याच्या तयारीत?





