“ही वेळ मराठी भाषेत….”; विद्या बालनच्या रीलने साधलं टायमिंग, मराठमोळ्या लूकमध्ये काय म्हणाली पाहा…

Vidya Balan reel : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाला राज्यभरातून मोठा विरोध होत आहे. विरोधकांकडून हिंदी लादली जात असल्याची टीका राज्य सरकावर केली जात आहे. अशातच अभिनेत्री विद्या बालन हिने अभिनेते भाऊ कदम यांच्या कॅामेडी डायलॅागवर एक रील करून तिच्या अकाऊंटवरून शेअर केले आहे. या रीलमधून विद्याने टायमिंग साधल्याचे बोलले जात आहे.
अभिनेत्री विद्या बालन नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवरून मराठीत रील तयार करून पोस्ट करत असते. नुकतेच तिने इरकलची साडी नेसून भाऊ कदम यांच्या डायलॉगवर अभिनय केला आहे. विशेष म्हणजे विद्या बालनचा हा लूक ग्रामीण भागातील महिलांप्रमाणे असल्याचे दिसत आहे. ही वेळ मराठी भाषेत रील शूट करण्याची आहे. कारण मी एका मराठी सिनेमासाठी शूटींग करत आहे, असे कॅप्शन विद्या बालनने या रीलला दिले आहे.
View this post on Instagram
मराठमोळ अभिनेता रितेश देशमुख त्याच्या आगामी राजा शिवाजी चित्रपटामध्य्ये महत्वाची भूमिका साकारत आहे. अभिनेत्री विद्या बालनही या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याची माहिती स्वतः विद्याने रीलच्या कॅप्शनमध्ये दिली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि जेनेलिया देशमुख हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत असणर आहेत. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून प्रेक्षक हा चित्रपट पाहाण्यासाठी आतूर आहेत.
हेही वाचा : रक्ताने माखलेला चेहरा, तीक्ष्ण नजर अन्…; रश्मिकाचा भीतीदायक लूक समोर; चित्रपटाचे नाव काय? फोटो पाहा





