Ajit Pawar: “राजकारणात वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत,”; दादांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंची भावुक पोस्ट

Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्ताने मुंबईहून बारामती दौऱ्यावर निघाले असताना लँडिंगवेळी अजितदादांचे विमान कोसळले आणि स्फोट होऊन ही दुर्घटना घडली.
त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या पाच जणांचा देखील मृत्यू झाला आहे. दादांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक राजकीय नेतेमंडळींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भावना व्यक्त केल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांची पोस्ट
‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!” असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे.
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला!
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे…
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 28, 2026
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री राहिले होते. याशिवाय राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांची पोस्ट
“अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत. दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा.
अजित दादांची बातमी ही धक्कादायक आहे! शब्दच नाहीत.
दादांसोबत गेले ५–६ वर्षं काम करण्याची संधी मिळाली… पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 28, 2026
मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजित दादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली,” असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
हेही वाचा:





