Elli AvrRam : ‘तुम्ही बेशुद्ध झालात तरीही….’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली ” जेवणाच्या वेळेलाही…”
Elli AvrRam : दाक्षिणात्य आणि बॅालिवूड इंडस्ट्रीत काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री एली अवरान हिने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.

Elli AvrRam : तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री एली अवराम हिने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कामाच्या पद्धतीतील फरकांबाबत आपले अनुभव शेअर केले आहेत.
दोन्ही इंडस्ट्रींनी तिला खूप काही शिकवले असले तरी, दाक्षिणात्य चित्रपटांच्या सेटवरील वातावरण अधिक शांत, सुव्यवस्थित आणि आदरपूर्ण असल्याचे तिने सांगितले. Elli AvrRam
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत एली म्हणाली की, दोन्ही ठिकाणी कामाचा अनुभव चांगला होता, मात्र कामाची पद्धत वेगळी आहे. “दाक्षिणात्य चित्रपटांच्या सेटवर शांतता जास्त असते, तर बॉलिवूडमध्ये सर्व काही खूप वेगाने घडते. तिथे लोक ओरडण्याऐवजी वॉकी-टॉकीचा वापर करतात,” असे तिने स्पष्ट केले.
धक्कादायक खुलासा (Elli AvrRam)
तिने पुढे सांगितले की, बॉलिवूडमध्ये कधी कधी शेड्यूल इतके व्यस्त असते की जेवणाच्या वेळेलाही शॉटसाठी बोलावले जाते. तुम्ही जेवलात की नाही, किंवा तुम्ही बेशुद्ध झालात तरीही तुम्हाला शॉट द्यावाच लागतो, जणू काही त्यांना त्याची पर्वाच नसते, असा धक्कादायक खुलासा तिने केला. मात्र, प्रत्येक प्रोजेक्टनुसार अनुभव बदलतो, असेही तिने स्पष्ट केले.
अलीकडील एका नेटफ्लिक्स प्रोजेक्टचा उल्लेख करताना एलीने सांगितले की, त्या सेटवर कलाकारांच्या आरामाची, जेवणाची विशेष काळजी घेतली गेली. “तो अनुभव खूपच छान आणि संतुलित होता,” असे ती म्हणाली.
या चित्रपटामुळे मिळाली लोकप्रियता (Elli AvrRam)
एली अवरामने 2013 मध्ये मिकी व्हायरस या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर यशस्वी ठरला नाही. मात्र, एली अवरान अनेकांच्या लक्षात राहिली. त्यानंतर ही अभिनेत्री बिग बॅासच्या सातव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर ती फारशी बॅालिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही. मात्र, कपिल शर्माच्या किस किस को प्यार करु या चित्रपटात ती झळकली होती. याच चित्रपटामुळे एली अवरानला मोठी लोकप्रियता मिळाली.






