Sunetra Pawar : लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ अर्थात 131वे घटनादुरुस्ती महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रातील रालोआ सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात असून, बहुमत असूनही विधेयक मंजूर होऊ न शकल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. Sunetra Pawar
मोदी सरकारकडून यापूर्वी अनेक महत्त्वाची विधेयके यशस्वीरित्या मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, महिला आरक्षण संदर्भातील अत्यंत महत्वाचे समजले जाणारे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे हा एनडीए सरकारसाठी एक मोठा झटका मानला जात आहे.
या घडामोडीनंतर विविध राजकीय पक्षांतील महिला नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर तीव्र शब्दांत एक्स या सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया दिली आहे. Sunetra Pawar

sunetra pawar
त्यांनी एक्सवरुन ट्वीटमध्ये म्हटले की, “कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा होता. महिलांना 1/3 आरक्षण देणारे 131वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही, ही गंभीर बाब आहे. महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कांवर आघात केला आहे.”
पुढे त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतरही विरोधकांनी सहकार्य न केल्याने हा निर्णय महिलांवरील अन्याय ठरतो. मात्र, “महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही, नारीशक्ती याला उत्तर देईल,” असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. Sunetra Pawar
विधेयक नामंजूर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात या मुद्द्यावरून संसदेत आणखी वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रियंका चुवर्वेदी काय म्हणाल्या?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावरुन पोस्ट केली आहे. त्यांनी महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. “माझी भूमिका सातत्याने महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने राहिली आहे आणि मी या मुद्द्यावर आवाज उठवतच राहीन.मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही जर तुम्हाला मी जशी आहे तसा पचनी पडत नसेल, तर तो तुमचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.
हेही वाचा : Gold Silver Price Today: लग्नसराईच्या आधी सोने-चांदीच्या दरात चढ-उतार ; जाणून घ्या आजचे नवीन दर