‘पाकिस्तानात गेले तरी मुखात विठुराया व छत्रपतींचेच विचार असणार’; शिवलीला पाटील पुन्हा चर्चेत

मुंबई – “बिग बॉस 3′ मराठी शोमध्ये सहभाग घेतलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्या चर्चेत होत्या. कारण त्यांचं बिग बॉस सारख्या शोमध्ये जाणं अनेकांना रूचलं नव्हतं. त्यामुळं शिवलीला प्रचंड ट्रोल झाल्या होत्या.
अनेक कीर्तनकार मंडळींकडून त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला असून, वारकरी संप्रदायात संतापाची लाट परसली होती. त्यामुळेच एका आठवड्यातच आजारी पडल्याचं कारण देत शिवलीला बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्या आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत सर्वांची माफी देखील मागितली.
“माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, हाच माझा शुद्ध हेतू होता. मी निवडलेला मार्ग चुकीचा असला तरी उद्देश प्रामाणिक होता. बिग बॉसमध्ये गेल्याबद्दल मी माफी मागते, पण मी पाकिस्तानात गेले तरी माझ्या मुखात विठुराया आणि छत्रपतींचेच विचार असतील”, असं वक्तव्य कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी केलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवलीला बोलत होत्या.





