Ismail Darbar Slams Sanjay Leela Bhansali | संगीतकार इस्माइल दरबार आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची जोडी उत्तम मानली जायची, पण सध्या त्यांच्यात बिनसल्याचं बोललं जातं आहे. दरबार यांनी यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीदरम्यान, संजय लीला भन्साळींना ‘अहंकारी’ म्हटलं. इतकेच काय तर त्यांना 100 कोटी रुपये ऑफर केले तरी ते त्यांच्यासोबत काम करणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. ‘हम दिल दे चुके सनम’ असो किंवा ‘देवदास’, त्यांच्या कलाकृतीतील हे दोघेही एकत्र आले, तेव्हा ते हिट झाले. पण त्यांच्यात काही तरी बिनसलं आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले. ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’चं म्युझिक ही सीरिजचा सर्वात मजबूत बाजू असल्याचं बोललं गेलं आणि याचं सर्व श्रेय इस्माईल दरबारला दिलं गेलं. तेव्हापासूनच दोघांच्या मैत्रीत दुरावा आल्याचं पाहायला मिळतंय. दरबारनं ही बातमी पसरवली, असं संजय लीला भन्साळी यांना वाटलं, ज्यामुळे त्यांच्या नात्यात मोठा तणाव निर्माण झाला. यानंतर दरबार यांनी ही सीरिज सोडली. दरबार यांना विचारण्यात आलं की, भन्साळींनी त्यांना परत बोलावण्याचा प्रयत्न केला का? यावर दरबार म्हणाले, “मी भन्साळींना सांगितलं होतं की, जर मला काही बोलायचं असेल तर मी उघडपणे बोलण्यास घाबरणार नाही. पण मला त्या बातमीबद्दल काहीही माहिती नव्हती. ज्यानंतर मी स्वतःहून हीरामंडी सोडली, कारण मला समजलं की, तो मला काढून टाकण्याचा विचार करतोय.” दरम्यान, संजय लीला भन्साळींनी इस्माईल दरबार कार्यालयात बोलावलं आणि चौकशी केली, ज्यामुळे दरबार यांना वाटलं की, भन्साळी त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. Ismail Darbar Slams Sanjay Leela Bhansali | इस्माइल दरबार यांचा खुलासा इस्माइल दरबारनं असाही खुलासा केलाय की, ‘गुजारिश’मध्येही तो संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करणार होता, पण ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ दरम्यान झालेल्या मतभेदांनी त्यांचं नातं खराब केलं. भन्साळींनी त्यांच्या पीआर टीमला इस्माइल दरबारची मुलाखत घेऊ नका, असे निर्देशही दिले होते. आज, जर संजय माझ्याकडं आला आणि म्हणाला, कृपया माझ्या चित्रपटासाठी संगीत दे, मी तुला १०० कोटी रुपये देईन, तर मी त्याला पैसे घेऊन येथून निघून जाण्यास सांगेलं.’ Ismail Darbar Slams Sanjay Leela Bhansali | हेही वाचा : हर्षवर्धन राणे पुन्हा प्रेमकथेतून प्रेक्षकांच्या भेटीला! Ek Deewane Ki Deewaniyat सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; ‘थामा’सोबत होणार टक्कर