“तुमचा खूप अभिमान वाटतो”; अंकिता लोखंडेने संजय लीला भन्साळींबाबत व्यक्त केली भावना

Ankita Lokhande Post | अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने चित्रपटांमध्येही काम केले आहे. अंकिता सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक वैयक्तिक तसेच कामाबद्दलचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतेच तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
अंकिताने तिचा पती विकास जैन आणि संजय लीला भन्साळी यांच्याबरोबरचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “संजय सर, या क्षणी मी खूपच भारावून गेली आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द देखील अपुरे पडत आहेत. तुमची तुमच्या कामाप्रती असलेली निष्ठा, तुमचा दृष्टिकोन, आतापर्यंतचा तुमचा या इंडस्ट्रीतला प्रवास या सगळ्यामुळे मला तुमच्याकडून काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. आज वेळात वेळ काढून भेटल्याबद्दल आणि माझ्याशी संवाद साधल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.” Ankita Lokhande Post |
View this post on Instagram
;
पुढे तिने लिहिले की, “आजचा हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुमचं मिळणारं मार्गदर्शन आणि तुमचा माझ्यावर असलेला विश्वास या सगळ्यामुळे माझ्यातली अभिनेत्री आकार घेत आहे. याबद्दल मी तुमची कायम ऋणी आहे. या इंडस्ट्रीत स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवणं सोपं नाही, पण माझ्या प्रतिकूल परिस्थितीत तुमचे विचार मला पुढे जाण्यासाठी पाठबळ देतात. संजय सर, मला तुमचा खूप जास्त अभिमान वाटतो”, अशा शब्दांत अंकिताने सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. Ankita Lokhande Post |
त्याचबरोबर तिने अभिनेता संदीप सिंहबरोबरचा फोटो पोस्ट शेअर करत कायम पाठीशी उभा राहिल्याने आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विकी जैन बिग बॉस 17 मध्ये सहभागी झाले होते. हा शो सोडल्यानंतर अभिनेत्री रणदीप हुडाच्या स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटात दिसली होती. तर आता ती आम्रपाली या वेब सीरिजमध्ये चित्रपट निर्माता संदीप सिंगसोबत काम करणार आहे, ज्यामध्ये ती आम्रपालीची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा:
भारतात मंकीपॉक्सच्या एन्ट्रीनंतर आरोग्य मंत्रालय सतर्क ; सर्व राज्यांना जारी करण्यात आल्या सूचना





