“उद्धव ठाकरे शंभर वेळा खेडमध्ये आले तरी…” रामदास कदम यांनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – शिवसेनेची स्थापना निवडणूक आयोगाच्या वडिलांनी केलेली नाही, तर माझ्या वडिलांनी केलेली आहे. निवडणूक आयुक्तांचे वडील कदाचित त्या ठिकाणी बसले असतील, पण ते तुमचे वडील असतील, माझे वडील नाहीत. हा चुना लगाव आयोग सत्तेचा गुलाम आहे. वरून जो हुकूम येतो त्याप्रमाणे वागणारे हे गुलाम आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खेड येथील सभेत शरसंधान साधले.तसेच यावेळी ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. एकेकाळचे शिवसेनेचे शिलेदार रामदास कदम यांनी देखील कालच्या सभेबाबत वक्तव्य केलं आहे.
‘खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला,उद्धव ठाकरेंनी शिवसेना खाजगी कंपनी करून ठेवली होती ते शिववसनिकांसह आमदार खासदारांना नोकर समजतात. अशी टीका रामदास कदम यांनी केली.माध्यमांशी संवाद साधत कदम यांनी ठाकरेंच्या सभेबाबत भाष्य केले. तसेच ठाकरेंच्या कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईल असेही कदम यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी सभेसाठी बाहेरून माणसं आणली होती. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा कोणताही अधिकारी नाही. उद्धव ठाकरे शंभर वेळा खेडमध्ये आले तरी योगेश कदम यांना पाडू शकणार नाहीत असं स्पष्ट मत रामदास कदम यांनी यावेळी व्यक्त केले.
काय म्हणाले होते ठाकरे सभेत..
जे भुरटे आहेत, चोर आहेत, गद्दार, तोतया आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही शिवसेना नाव चोरू शकाल असे तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही शिवेसना नाही चोरू शकत. धनुष्यबाण तुम्ही कदाचित चोरला असेल पण तो तुम्हाला पेलवेल असं अजिबात नाही. धनुष्यबाण घेऊन रावण उताणा पडला. मग मिंदे काय उभा राहणार?, असा घणाघात ठाकरे यांनी केला.




