“मुखवटे बदलले तरी चेहरे तेच, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच”

नवी दिल्ली :सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. त्यातच आज ‘भारत बंद’ची शेतकऱ्यांनी हाक दिली आहे. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला. दरम्यान, यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
“मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…? कोणी कामगारांना फसवलं..? कोणी कामगारांना उद्ध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..? माझ्या शेतकरी बांधवानो, तुम्ही आठवा थोडे मागचे, मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत, डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत,” असं म्हणत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली.
मुंबईतील गिरणी कामगारांना कोणी संप करायला लावला…?कोणी कामगारांना फसवलं..?कोणी कामगारांना उध्वस्त केलं..? कोणी मालकांचे फायदे करुन दिले..?
माझ्या शेतकरी बांधवानो,
तुम्ही आठवा थोडे मागचे,
मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत
डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 8, 2020
“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?, काँग्रेसने स्वतः जे केले त्या विरोधातच भारत बंद?, काँग्रेसच्या फसवणुकीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात महाराष्ट्रात शेती विषयक सुधारणा कायदा झाला. त्या सुधारणा आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का?,” असे सवालही शेलार यांनी केला.
सोमवारी काही शेतकरी संघटनांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या काही संघटनांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं. तसंच यासंदर्भात एक पत्रदेखील कृषीमंत्र्यांना देत नवे कायदे रद्द न करण्याची मागणी करण्यात आली. हरयाणातील शेतकरी काही शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांकडे लक्ष देत त्या नव्या कायद्यांमध्ये सामील केल्या जाव्या असं या संघटनांचं म्हणणं होतं. पीएफओ आणि प्रगतीशील शेतकरी संघटना या एमएसपी आणि बाजार समित्यांच्या बाजूनं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.





