Pankaja Munde : “मी हरले तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही…’; पंकजा मुंडेंची भावनिक साद

Pankaja Munde – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विजयादशमीनिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील भगवान बाबा भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्याला संबोधित करताना राज्यातील राजकीय परिस्थितीसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सांगत कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा माझ्या कारखान्यावर कारवाई झाली, त्यानंतर तुम्ही पैसे गोळा करीत असताना माझ्या मुलाने मला फोन करून विचारले की, तु ते पैसे घेणार आहेस का? मी त्याला उत्तर दिले मी पैसे घेणार नाही,
पण त्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही. माझ्यावर तुझ्या आधी हे लोक माझी जबाबदारी आहेत. तुझ्यापेक्षाही या लोकांचा अधिकार जास्त आहे असेही वक्तव्य यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्या कारखान्यावर छापे पडले तेव्हा तुम्ही कोट्यवधी रुपये जमा केले, मी हरले तरी मी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही. मला काही देऊ नका, पण माझ्या माणसांची प्रश्न सोडवा.
तर ज्यांना पदे दिले ते माझ्या मेळाव्यातून दूर गेले आहेत. मी एखादी निवडणूक हरले असेल पण तुमच्या नजरेत मी पडले नाही. मी तसे कृत्य केले नाही, असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केले.





