Amruta Fadnavis : “कॉपी केल्या तरी…”; लाडकी बहीण योजनेवरून अमृता फडणवीसांचा थेट केजरीवालांना टोला
Updated On:

Amruta Fadnavis | Arvind Kejriwal | Ladki Bahin Yojana – राहुल गांधी यांना तुम्ही गांभीर्याने घेत असाल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधतान त्यांनी हे विधान केले आहे.
अमृता फडणवीस यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर अशी टीका केल्याने आता कॉंग्रेस कुठली भूमिका घेते याकडे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले की, अरविंद केजरीवाल लाडकी बहीण योजना सुरू करणार आहेत.
यावर काय वाटते? यावर उत्तरताना अमृतांनी, चांगल्या गोष्टी कॉपी केल्या तरी त्याचे काही वाटत नाही. आम्ही देखील मध्यप्रदेशला बघून सुरू केले आहे. तसेच आमचे बघून अजून कोणी करत असेल तर मला काही प्रॉब्लेम नाही, असे म्हटले.





