ऐन निवडणुक काळातही कर्नाटकात केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरूच
Updated On:

मंगलुरू – आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कॉंग्रेस नेते गंगाधर गौडा यांच्या दोन निवासस्थानांवर छापे टाकले. त्यांच्या दक्षिण कन्नड मधील शिक्षण संस्थेवरही आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
ऐन निवडणुक काळातही भाजपकडून विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांमार्फत कारवाई करून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गंगाधर गौडा यांनी सन 2018 मध्ये भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यांना कॉंग्रेसने या निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही, त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान आयकर विभागाने तामिळनाडुतही विविध ठिकाणच्या संस्थांवर छापे टाकले असून या छाप्यांची संख्या 50 पेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या संस्था डीएमकेशी संबंधीत आहेत असे सांगण्यात येते.





