‘दंगल’पूर्वीही ‘या’ सिनेमात आमिर सोबत बालकलाकार म्हणून झळकली होती फातिमा सना शेख; स्वतः सांगितलं तो किस्सा….

fatima sana shaikh | aamir khan : ‘दंगल’ चित्रपटातील ‘दंगल गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री फातिमा सना शेख तिच्या दमदार अभिनयाने आणखी प्रसिद्ध झाली आहे. २०१६ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलेल्या या चित्रपटात फातिमाने आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती.
या सिनेमातून पहिल्यांदाच आमिर आणि फातिमा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते, परंतु अभिनेत्रीने खुलासा केला की तिने यापूर्वीही आमिरसोबत काम केले आहे. फक्त एक नाही तर ती आमिरच्या दोन चित्रपटांचा भाग राहिली आहे. स्वतः फातिमाने याबद्दल सांगितलं आहे.
होय! फातिमाने सांगितले की, ‘दंगल’पूर्वी तिने आमिरसोबत बालकलाकार म्हणूनही काम केले होते. फातिमाने सांगितले की, आमिर खान, काजोल, जुही चावला आणि अजय देवगण यांच्या ‘इश्क’ चित्रपटात ती बाल कलाकार होती. आता तिचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती काजोलच्या मांडीवर गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली दिसत आहे.
फातिमाने सांगितले की, ‘इश्क’ चित्रपटाव्यतिरिक्त ती आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ यांच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातही होती. तथापि, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला. याशिवाय फातिमाने ‘वन टू का फोर’, ‘बडे दिलवाले’ आणि ‘चाची ४२०’ सारख्या इतर चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये, फातिमा सना शेखने खुलासा केला की तिने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हे ऐकून, या जोडप्याने सांगितले की ते आता तिला ओळखण्यासाठी पुन्हा चित्रपट पाहावे लागतील.
फातिमा म्हणाली, “खूप वर्षांपूर्वी ‘इश्क’ हा चित्रपट आला होता. त्यात एक दृश्य आहे जिथे आमिर जातो आणि ‘मारा मारा मारा’ करतो आणि त्याच्या समोर काजोल एका लहान मुलीला हातात धरून आहे. तर ती लहान मुलगी मी आहे. हो, ती मी आहे.” असं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं.
आमिर खानशी जोडले गेले नाव :
काही महिन्यांपूर्वी आमीर खान आणि फातिमा सना शेख यांच्यातील जवळीकतेच्या बातम्या वारंवार येऊ लागल्या होत्या. त्यांच्या जवळीकतेच्या अफवा कोणत्याही कारणाशिवाय पसरल्या नाहीत, ते अनेक वेळा एकत्र दिसले होते, परंतु त्यांच्या नात्याची पुष्टी झालेली नाही आणि आता आमिर खान गौरी स्प्रेटला डेट करत आहे.





