40 वर्षांनंतरही ‘हा’ आवाज रेल्वे स्थानकांमध्ये गुंजतोय! कोणाचा आहे हा आवाज?

रेल्वेतील प्रवासादरम्यान तुम्ही ‘प्रवाशांनी कृपया लक्ष द्या…’ ही खास घोषणा अनेकदा ऐकली असेल. गेल्या 40 वर्षांपासून हा आवाज ऐकू येत आहे. ही घोषणा आता भारतीय रेल्वेची ओळख बनली आहे. या आवाजाने कोणाचेही लक्ष वेधले जाऊ शकते. तो आवाज कोणाचा आहे याचा कधी विचार केला आहे का? हा आवाज संगणकीकृत होणार असून प्रत्येक स्थानकावर तो वेगळा असेल, असे काही लोकांचे मत आहे. मात्र तसे होणार नाही.
भारतातील विविध रेल्वे स्थानकांवर ऐकू येणारा हा आवाज सरला चौधरी यांचा आहे. 1982 पासून त्या रेल्वेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यादरम्यान सरला चौधरी यांच्यासह अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र सरला चौधरी यांचीच निवड झाली. सुरुवातीला ही निवड तात्पुरती होती. मात्र त्यांच्या आवाजाला मोठी मागणी आल्यानंतर 1986 मध्ये त्यांना कायम करण्यात आले.
हा आवाज आजही वापरला जातो
विशेष म्हणजे 2015 मध्ये ही घोषणा पूर्णपणे संगणकावर आधारित करण्यात आली होती. असे असतानाही रेल्वेने हा आवाज वापरणे सुरूच ठेवले. पूर्वी रेकॉर्ड केलेला हा आवाज आजही देशभरातील रेल्वे स्थानकांवर गुंजतो. नवीन गाड्या आल्याने आवाज मध्येच जोडला जातो. सध्या या आवाजाच्या मालकीण सरला रेल्वे उद्घोषक पदावर नाही. पण त्यांचा आवाज आजही कार्यरत आहे.
सरला चौधरी यांना सुरुवातीच्या काळात रेल्वे स्थानकांवर उद्घोषणा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. या घोषणा अनेक भाषांमध्ये रेकॉर्ड केल्या गेल्या. यानंतर रेल्वेने घोषणेची जबाबदारी ट्रेन व्यवस्थापन यंत्रणेकडे सोपवली.





