शंभर रुपयांची नोटही याच्यापेक्षा मोठी; पहा जगातील सर्वात लहान कुत्रा

नवी दिल्ली – पाळीव प्राणी म्हंटलं कि आपल्याला लगेच आठवतो तो कुत्रा. लोकांना कुत्रा पाळण्याची खूप आवड असते. कारण त्याची एक आज्ञाधारक प्राणी म्हणून ओळख आहे. ‘एक वेळ कुत्र्याला कळतं पण तुला नाही..’ हे वाक्य अनेकदा वापरले जाते. ‘कुत्रा’ या प्राण्याची बुद्धी अधिक तल्लख असल्यामुळे लष्करामध्ये शोधमोहीम पथकामध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो.
तसेच कुत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन चांगल्या सवयी लावण्याचे प्रयत्न आपण करत असतो. असाच एक छोटासा कुत्रा सध्या संपूर्ण जगाच लक्ष्य वेधून घेत आहे. उंचीने सर्वात लहान कुत्रा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
या कुत्र्याचं नाव ‘पर्ल’ असे असून तो ‘चिहुआहुआ’ या प्रजातीचा आहे. १ सप्टेंबर २०२० मध्ये त्याचा जन्म झाला होता. ‘पर्ल’ ची उंची अवघी ३.५९ इंच एवढीच असून लांबी केवळ ५ इंच इतकीच आहे. पर्ल याच ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार देऊन कौतुक देखील करण्यात आलं आहे.





