उदापूर : उत्तर पुणे जिल्ह्यातील अणे-माळशेज भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. डिंगोरे – उदापूर जिल्हा परिषद गट अनुसूचित जमाती (महिला) आरक्षणात असल्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांची राजकीय समीकरणे कोलमडली असून त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. आरक्षण जाहीर होताच गटागटांमध्ये उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली असून, सोशल मीडियावर फोटोसह उमेदवारीचे संकेत देत मोबाइलवरच प्रचाराचा धुरळा उडविण्याचे चित्र दिसत आहे. काही नेतेमंडळींनी तर आपल्याच घरातील महिला चेहऱ्यांना राजकारणात पुढे करण्याची तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक साखरपुडा, लग्नसमारंभ, दशक्रिया किंवा वाढदिवस कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी संवाद साधण्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र, अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने काही प्रस्थापित नेते आता आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईक असलेल्या महिला सदस्यांना पुढे करून राजकीय अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच डिंगोरे-उदापूर गटातील आगामी निवडणूक नव्या चेहऱ्यांमुळे अत्यंत चुरशीची, अटीतटीची आणि रंगतदार होणार, यात शंका नाही. डिंगोरे-उदापूर गट २०१७ चा निकाल अंकुश सखाराम आमले (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) १०४२५ (४२.५६ टक्के) विजयी बबन निवृत्ती कुलवडे (शिवसेना) ९५५१ (३८.९८ टक्के) बापू नाथा कुमकर (भाजपा) ३०६९ (१२.५२ टक्के) संदीप बबन मंडलिक (काँग्रेस) १०३३ (४.५२ टक्के) नोटा – ४१६ (१.७० टक्के). डिंगोरे – उदापूर गटातील गावे उदापूर, पिंपळगाव जोगा, अहिनेवाडी, मंदारणे, आंबेगव्हाण, चिल्हेवाडी, मांडवे, कोपरे, सांगनोरे, खुबी, पारगाव तर्फे मढ, तळेरान, डिंगोरे, नेतवड, बल्लाळवाडी, आलमे, पांगरी तर्फे मढ, मढ, सीतेवाडी, गोळेगाव, अलदरे. इच्छुक उमेदवार अनिता शिंगाडे सोनाबाई दाभाडे आशा डावखर स्नेहल मेमाणे अनिता घोडे