‘डॉग रेस्क्यू’ सेंटर तातडीने स्थापन करा – उपमहापौर घोळवे
Updated On:

पिंपरी – शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांना भटके श्वान चावण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
भोसरी-सद्गुरूनगर येथील जुना कचरा डेपोच्या पर्यायी जागेत भटक्या श्वानांसाठी डॉग रेस्क्यू सेंटर तातडीने स्थापन करावे, अशी मागणी उपमहापौर केशव घोळवे यांनी केली आहे.
त्यांनी याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत आहे.
शहरातील लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना त्रास सहन करावा लागत असल्याने डॉग रेस्क्यू सेंटर तातडीने स्थापन करण्यात यावे. तसेच, नागरिकांना होणाऱ्या त्रासामधून वाचवावे.





