Pimpari News : पिंपरीतील ‘या’ रेल्वे स्टेशमध्ये सुरू झालंय ‘बोगी-वोगी’ रेस्टॅारंट; केंद्रीय रेल्वे बोर्डाचा ‘रेस्टॅारंट अॅान व्हिल्स’ उपक्रम

पिंपरीः आपल्याला अनेक ठिकाणी नेहमीच्या शैलीपेक्षा काहीतरी वेगळं अशा स्वरुपाची रेस्टाॅरंट पाहिला मिळतात. अशा प्रकारच्या रेस्टाॅरंटमध्ये अनोख्या पद्धतीने सजावट केल्याचे दिसते. केंद्रीय रेल्वे बोर्डने ‘रेस्टाॅरंट अॅान व्हिल्स’ या उपक्रमाअंतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशनमध्ये ‘बोगी-वोगी’ नावाचे रेस्टाॅरंट सुरू केले आहे. आश्चर्यची गोष्ट म्हणजे हे रेस्टॅारंट चक्क रेल्वेच्या एका डब्यात असून, यामध्ये ४४ जणांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे.
या रेस्टारंटमध्ये रेल्वे प्रवाशांना शाकाहारी मासांहारी जेवणासोबतच विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. अशा विविध प्रकारच्या गोष्टीमुळे बोगी-वोगी रेस्टाॅरंट रेल्वे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे. वास्तुविशारद मंदार पोकळे यांच्या संकल्पनेतून बोगी-वोगी या रेस्टॅारंटची रंगरंगोटी करण्यात आली आहे. या रेस्टॅारंटमध्ये आकर्षक पद्धतीने सजावट केलेली आसनक्षमता रेल्वे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.
अशी आहे रेस्टाॅरंटची रचना
या रेस्टॉरंटमध्ये ११ टेबलसह ४४ जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना शाकाहारी, मासांहारी आणि इतर प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे हे रेस्टॅारंट २४ तास रेल्वे प्रवाशांना सेवा देणार आहे. स्वादिष्ट आणि हायजेनिक अन्नाचा स्वाद या रेस्टॅारंटमध्ये घेता येणार आहे. रेस्टाॅरंटमधील अन्नपदार्थ अगदी माफक दरात दिले जाणार आहे. २४ तास रेस्टॅारंट खुले असल्याने रात्रीच्या वेळी हॅाटेल बंद असल्यास या रेस्टॅारंटमध्ये विद्यार्थी व इतर प्रवाशांची जेवणाची सोय मिळणार आहे.





