‘आश्रम 3’मध्ये बॉबी देओल सोबत रोमान्स करताना दिसली ईशा गुप्ता; भूमिकेबद्दल केला ‘हा’ खुलासा

नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया ईशा गुप्ता तिच्या आगामी वेब सिरीज ‘आश्रम 3’ मध्ये झळकणार आहे. नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर आला आहे. या ट्रेलरला मिळालेल्या प्रतिक्रिया बघून अभिनेत्री उत्साहित झाली आहे. ‘आश्रम 3’ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने उत्कंठा वाढवली असून एका थरारक गुन्हेगारी ड्राम्याचा मंच तयार केला. या वेब सीरिजमध्ये अभिनेता बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनमध्ये बॉबीच्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक झाले होते. ही सिरीज प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
दरम्यान आश्रमच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्तालाही शोचा भाग बनवण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये ईशाची एक झलक दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये ती बाबा निराला म्हणजेच बॉबी देओलसोबत रोमान्स करताना दिसत आहे. मात्र, अभिनेत्रीची भूमिका काय आहे, हे सिरीज पाहिल्यानंतरच कळेल.
ईशा ‘आश्रम 3’च्या व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली, “‘आश्रम 3’ मधील माझी भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला. मला आनंद आहे की प्रेक्षक ट्रेलरचा आनंद घेत आहेत आणि मला खात्री आहे की त्यांना ही सिरीजही आवडेल.”
राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रकाश झा यांनी आश्रम 3 चे दिग्दर्शन केले आहे. याआधी सीझन एक आणि दोनमध्ये त्याच्या दिग्दर्शनाचे खूप कौतुक झाले होते. अलीकडेच त्याच्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे, ज्याला काही दिवसांत 34 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा ट्रेलर लोकांना खूप आवडला असून प्रेक्षक या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या वेब सिरीजमध्ये बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांच्याशिवाय दर्शन कुमार, त्रिधा चौधरी, अनुप्रिया गोएंका, चंदन रॉय, सचिन श्रॉफ आणि आदिती सुधीर पोहनकर हे कलाकार दिसणार आहेत. ही वेब सिरीज 3 जूनपासून MX Player या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रीमियरसाठी सज्ज आहे.





