Epstein Files। अमेरिकेत सध्या एपस्टीन फाईल्सने मोठी त्सुनामी आणली आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप यातून करण्यात आले आहेत.अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ) मंगळवारी रात्री या प्रकरणाशी संबंधीत जवळपास 30 हजार पानांचा दुसरा संच प्रसिद्ध केला. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या दस्तावेजातून ही माहिती उघड झाली आहे. एपस्टीन फाईलमध्ये ट्रम्प आणि एपस्टीन यांच्या जुन्या संबंधाचे फोटो, खासगी यात्रेतील फोटो आणि इतर अनेक दस्तावेज समोर आले आहेत. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पोप गायक मायकल जॅक्सन आणि इतर अनेक प्रभावशाली व्यक्तींचे फोटो बाहेर आले आहेत. पण ट्रम्प यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाने अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे. एपस्टीनच्या खासगी जेटमध्ये ट्रम्प यांची भरारी Epstein Files। डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी सार्वजनिक स्तरावर एपस्टीनसोबत मैत्री तुटल्याचे जाहीर केलेल आहे. तर एपस्टीनसोबत आपण कधीही विमान प्रवास केला नसल्याचा दावा केला. पण नवीन फ्लाईट लॉग्स इनमध्ये दोघांनी एकत्रित प्रवास केल्याचे समोर आले आहे. फाईल्समधील जानेवारी 2020 मध्ये एक ईमेल समोर आला आहे. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी 1993 ते 1996 या काळात एपस्टीन सोबत जवळपास 8 वेळा खासगी यात्रा केली आहे. या खासगी प्रवासात एपस्टीन, डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची त्यावेळची पत्नी मार्ला मॅपल्स, त्यांची मुलंही सोबत असल्याचे समोर आलेले आहे. या फाईल्समध्ये ट्रम्प यांनी काही गुन्हा केल्याचे मात्र नमूद नाही. अनोळखी तरुणीसोबत ट्रम्पचा फोटो या एपस्टीन फाईल्सनुसार, या हवाई प्रवासात, विमान प्रवासात चार वेला एपस्टीन याचा साथीदार गिस्लीन मॅक्सवेल हा सोबत होता. त्याला अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि ह्युमन ट्रॅफिंग, सेक्स ट्रॅफिकिंग या कारणासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. 1993 मधील एका विमान प्रवासात एपस्टीन, ट्रम्प आणि एक 20 वर्षीय सुंदर तरुणीसोबत दिसले. या तरुणीची ओळख लपविण्यात आली आहे. तर इतर विमान प्रवासात इतर महिलांचा पण समावेश दिसतो. या तरुणी सेक्स ट्रॅफिकिंगसंबधीत असल्याचे समोर येत आहे. फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप Epstein Files। एपस्टीन फाईल्समध्ये FBI च्या फाईल्सच्या आधारे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर 2020 मधील ही फाईल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये एका महिलेने हा आरोप केला आहे. त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टीन या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या फाईलमध्ये लिमोजीन चालकाचाही उल्लेख आहे. 1995 मध्ये त्याने एका कॉलवरील संवाद ऐकला होता. त्यात ट्रम्प हे एका मुलीसोबत आपण कसं वागलो याचा खुलासा करत असल्याचा दावा त्याने केला होता. पण ज्या मुलीसोबत हे कृत्यं झालं. तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर या प्रकरणात तपास अद्याप बाकी असल्याचे एफबीआयचं म्हणणं आहे. त्यामुळे बलात्काराच्या आरोपावर कोणताही खुलासा देण्यास एफबीआयने नकार दिला आहे. पण या ताज्या घटनाक्रमामुळे ट्रम्प हे चांगलेच अडचणीत सापडल्याचे दिसते.