Premier League : रोनाल्डोच्या हॅटट्रिकने मॅंचेस्टरचा विजय

लंडन – जागतिक स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo ) याने क्लब कारकिर्दीत 50 वी हॅटट्रिक केल्यामुळे मॅंचेस्टर युनायटेडने ( Manchester United ) प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्विच ( Norwich ) सिटीवर 3-2 असा विजय मिळवला. मॅंचेस्टर युनायटेडला चॅम्पियन्स लीग पात्रता फेरीच्या गुणतालिकेत तळाशी असलेल्या नॉर्विचवर विजय मिळवण्याची संधी होती ती त्यांनी साधली.
या सामन्यात पहिल्या हाफमध्ये किरन डोवेलने 45 व्या मिनिटाला गोल केला व नॉर्विचला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्टार फॉरवर्ड तेमू पुक्कीने 52 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. मात्र, त्यानंतर सबकुछ रोनाल्डो असेच चित्र निर्माण झाले.
त्याने 7 व्या, 32 व्या व 76 व्या मिनिटाला गोल करत संघाचा विजय साकार केला तर हॅटट्रिकही साकार केली. नॉर्विचवरील विजयासह युनायटेड 32 सामन्यांतून 54 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, तर दुसरीकडे नॉर्विच 21 गुणांवर तळाशी आहे.





