Urvashi Rautela | बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. मात्र आता तिने केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये तिने उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळील एक मंदिर तिच्यासाठी बांधण्यात आले असल्याचा दावा केला आहे. ज्यानंतर तिच्यावर टीका केली जात आहे. तिच्या वक्तव्यामुळे बद्रीनाथ धामचे पंडितांनी संताप व्यक्त केला आहे.
उर्वशीने उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळील एक मंदिर तिच्यासाठी बांधण्यात आल्याचा दावा केला आहे. हा दावा करताना तिने मंदिरात लोक तिच्या आशीर्वादासाठी येतात असेही सांगितले. इतकेच काय तर दक्षिण भारतात देखील माझं एक मंदिर असावं, अशीही इच्छा तिने व्यक्त केली आहे.
पंडितांनी व्यक्त केला संताप
तिच्या वक्तव्यांवर पंडितांनी संताप व्यक्त केला आहे. “हा सर्व मूर्खपणा आहे, ते मंदिर तिचं नाही तर उर्वशी नावाच्या देवी सतीचे आहे. उर्वशी मंदिर हिंदू पौराणिक कथांमध्ये पूजनीय असलेल्या देवी सतीशी संबंधित आहे. हे १०८ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.” Urvashi Rautela |
याशिवाय उत्तराखंड चारधाम तीर्थपुरोहित महापंचायतीने उर्वशीच्या विधानाचा विरोध केला आहे. बद्रीनाथ धामजवळील उर्वशी मंदिराबाबत दिलेले विधान मागे घेतले नाही आणि माफी मागितली नाही तर न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशारा महापंचायतने दिला. Urvashi Rautela |
दरम्यान, उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बामणी गावात उर्वशी मंदिर आहे. बद्रीनाथ धामपासून एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे बद्रीनाथ धामला जाणारे सर्व प्रवासी या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. Urvashi Rautela |
हेही वाचा :
Nilesh Rane : आमदार होतात ना? मग २ वर्षे काय केलं? नीलेश राणेंचा वैभव नाईकांना सवाल