Abhijit Kelkar : तुकाराम मुंढेंना शिक्षण खातंही सोपवा; मराठी अभिनेत्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी, पोस्ट चर्चेत
Abhijit Kelkar : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा मराठी अभिनेता शशांक केळकर याने फेसबुक पोस्टद्वारे तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे कौतुक करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे.

Abhijit Kelkar : IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचयाचे आहे. मात्र, आता या नाव अधिक चर्चेत असून या नावाची भीती भेसळखोरांना बसली आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून ते भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाया करत आहेत.
यामुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सुरुवातीला पनीर, दूध, गुटखा यातील भेसळ रोखण्यासाठी मुंढेंनी कडक पाऊलं उचलली. ही कारवाई सुरूच ठेवून अन्न आणि औषध विभागाशी निगडीत असणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्यांनी आपला मोर्चा वळवत धाडसत्र राबवले आहे.
त्यांच्या याच कारवाईची सामान्य नागरिकांमध्ये चर्चा असून आता सेलिब्रेटी देखील तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कारवाईचं कौतुक करत आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा मराठी अभिनेता शशांक केळकर याने फेसबुक पोस्टद्वारे तुकाराम मुंढेंच्या कारवाईचे कौतुक करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोठी मागणी केली आहे. त्याची फेसबुकवरील पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
Tukaram Mundhe साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, अशी थेट मागणी अभिनेत्याने केली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील समर्थक दर्शवणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
नेमकी पोस्ट काय?
Tukaram Mundhe साहेबांचा, कामाचा आणि कारवायांचा धडाका पाहता त्यांच्याकडे तात्काळ शिक्षण खातंही सोपवायला हवं, असं अगदी मनापासून वाटतंय म्हणजे प्रायव्हेट शाळांची मनमानी, मुजोरी, बेफिकिरी, विद्यार्थ्यांची आणि पालकांचीही गळचेपी, ह्या सगळ्याला आपोआप चाप बसेल आणि system खऱ्या अर्थाने, “मुळापासून” स्वच्छ व्हायला सुरवात होईल… Devendra Fadnavis जी, हे करा please असं पोस्टमध्ये अभिनेता अभिजीत केळकरने म्हटलं आहे.
कारवाई सुरूच
दरम्यान, मे २०२६ मध्ये एफडीएचा (FDA) च्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू केली. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात बनावट दूध आणि चीज बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दूध हा केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या पोषणाचा पाया आहे आणि त्यातील भेसळ खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दात इशारा तुकाराम मुंढेंनी दिला आहे.





