Manjusha Nagpure : महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निवासस्थानी श्री गणरायांचे उत्साहात आगमन
Manjusha Nagpure : महापौर मंजुषा नागपुरे पती दीपक नागपुरे यांच्या हस्ते श्री गणरायांची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

पुणे :पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या महापौर निवासस्थानी आज भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात श्री गणपती बाप्पांची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि भक्तिभावाच्या वातावरणात गणरायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
महापौर मंजुषा नागपुरे पती दीपक नागपुरे यांच्या हस्ते श्री गणरायांची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पुणे शहरातील नागरिकांचे सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, शांतता तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी श्री गणरायांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
“विघ्नहर्त्या श्री गणरायांच्या आशीर्वादाने पुणे शहराची विकासाची वाटचाल अधिक गतिमान व्हावी. शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदावी,” अशी भावना महापौर मंजुषा नागपुरे यांनी यावेळी व्यक्त केली.
गणरायांच्या आगमनाने महापौर निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये आनंद, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, अशी मंगलकामनाही यावेळी करण्यात आली.





